महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 25, 2019, 11:13 AM IST

Updated : Sep 25, 2019, 1:05 PM IST

ETV Bharat / state

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. या घटनेनंतर नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती;

रायगड- उरण येथील ओएनजीसीच्या एपीयू युनिटमधून सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायू गळती झाल्याचे समोर आले आहे. ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. या घटनेनंतर नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. दरम्यान, सध्या गॅस गळती नियंत्रणात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट
उरण येथील ओएनजीसीच्या युनिटमधून आज पुन्हा गळती झाली. त्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासुन समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मात्र पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Last Updated : Sep 25, 2019, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details