पनवेल- उरणमधल्या ओएनजीसी गॅस प्रकल्पातून पुन्हा एकदा वायुगळती झाली असून वेळीच फोम मारल्याने मोठी दुर्घटना टळली. ओएनजीसीच्या एपीयू युनिटमधील ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट पिरवाडी समुद्रात पोहोचला. हा सर्व प्रकार पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. त्यानंतर तातडीने या नाफ्तावर मोठ्या प्रमाणावर फोम मारण्यात आले. जेणेकरून त्याचा ऑक्सिजनशी संपर्क होऊन तो पेट घेऊ नये. परंतु येथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा एकदा वायुगळती; ग्रामस्थ चिंतेत - ओएनजीसी
उरणमधल्या ओएनजीसी गॅस प्रकल्पातून पुन्हा एकदा वायुगळती झाली असून वेळीच फोम मारल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वीच उरणमध्ये ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली होती. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला होता. उरण मधील ओएनजीसी प्लांटच्या जमिनीखाली नाफ्ता वायूच्या टाक्या आहेत. आज पुन्हा एकदा नाफ्ता वायूच्या या टाक्या ओव्हरफ्लो होऊन रात्री दीडच्या सुमारास त्याची गळती होऊ लागली. हा नाला नागरी वस्तीतून जात असल्याने आजुबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही दिवसांपूर्वी घडलेला अग्नितांडव आठवून लोकांनी आपली घरे सोडून पळ काढला.