पेण ( रायगड ) -पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ( Gang Rape on Minor Girl ) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ( Raigad District Police ) सात आरोपींना अटक केली आहे. अद्याप तिघांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून अटकेतील सात जणांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी ( Police Custody ) सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेण तालुक्यातील वाशी सरेभाग येथील एक अल्पवयीन मुलगी हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. त्या ठिकाणी दोन तरुणांसोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर काही दिवसांनंतर प्रेमात झाले. तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्या तरुणांच्या मित्रांना याबाबतची माहिती व तरुणीचा मोबाईल नंबर मिळताच त्यांनी तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. नराधम तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करत होते.
असे आले प्रकरण उघडकीस - पीडित युवतीला हे नराधम लैंगिक शोषणासाठी वारंवार फोन करत होते. आपल्या मुलीला वारंवार फोन येत असल्याने पीडित युवतीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर पीडित युवतीने सामूहिक अत्याचाराबाबत सांगितले.