रायगड- गणरायाचे आगमन घरोघरी झाले असताना वरुणराजानेही वक्रदृष्टी केली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने ऐन गणेशोत्सव सणात नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. घरात पाणी घुसले असल्याने नागरिकांसह गणरायही पुराच्या वेढ्यात सापडले आहेत.
रायगड : पुराचा फटका घरात विराजमान झालेल्या गणरायालाही - flood in raigad
गणरायाचे घरोघरी आगमन झाले असल्याने वातावरण चैतन्यमय आहे. मात्र, मुसळधार पावसाने नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने ऐन गणेशोत्सव सणात नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांसह गणरायही पुराच्या वेढ्यात सापडले आहेत.
गणरायाचे आगमन घरोघरी झाले असल्याने वातावरण चैतन्यमय झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमशान घातले असल्याने जिल्ह्यातील अंबा, सावित्री, कुंडलिका नद्या धोक्याची पातळी ओलांडून तुडूंब वाहत आहेत. पावसाने जिल्ह्यात मुसळधारपणे हजेरी लावल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.
नागोठणे, पनवेल, उरण, रोहा, महाड, पाली याठिकाणी पूरस्थिती आहे. नागरिकांच्या घरात गणरायाचे आगमन झाले असताना पुराचे पाणी घरात घुसले आहे. घरात आपला लाडका बाप्पा मखरात विराजमान झाले असताना पुराचे पाणी घरात घुसल्याने गणरायही पुराच्या पाण्यात अडकले आहेत. पाणी घरात घुसले असले तरी गणेशभक्तांनी गणरायाची पूजा, आरती यथासांग सुरू ठेवली आहे. पुराच्या पाण्यातून लवकरच सुटका करा अशी याचनाही गणेशभक्त आरतीतून गणेशाला करत आहेत.