महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. माथेरानच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते पाणी गाढी नदीत वाहून आले आहे.

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

By

Published : Aug 4, 2019, 7:55 PM IST

रायगड - संततधार पावसामुळे पनवेल शहरातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गाढी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. माथेरानच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते पाणी गाढी नदीत वाहून आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी या गाढी नदीत जमा होत असल्याने आता गाढी नदी ओसंडून वाहू लागली आहे. पावसाच्या रुद्रावतारामुळे अनेकांनी घरातून बाहेर न पाडण्याचाच निर्णय घेतला.

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना घरातील वीज पुरवठा बंद ठेवून, गरज असेल तरच बाहेर पडण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details