महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाडमधील सावित्री नदीच्या पुलावर मगरीचा मुक्त संचार - gandhari bridge

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे सावित्री नदीतील एक मगर गांधारी पुलावर मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गांधारी पुलावरील मगरीचे छायाचिञ

By

Published : Jul 29, 2019, 9:26 PM IST

रायगड - जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे सावित्री नदीतील एक मगर गांधारी पुलावर मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

गांधारी पुलावर मगरीचा मुक्त संचार
रात्रीच्या सुमारास नदीत असलेल्या मगरीं पैकी एक मगर अचानक वाहत्या पाण्याबरोबर पुलावर आली. या पुलावर तिचा संचार सुरू होता. त्यानंतर ही बाब महाडकरांच्या लक्षात आल्यावर तिला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी त्या मगरीचा व्हिडिओ उपस्थितांपैकी एकाने काढून सोशल मीडियावर टाकला. मगरीच्या संचाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुराचे पाणी कमी झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात परत गेली. महाडमधील सावित्री नदीत अनेकदा या मगरी पाहावयास मिळतात. पुरामुळे ती पुलावर आल्याने ती शहरातही घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details