रायगड -कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन अहोरात्र झटत आहेत. या सर्व यंत्रणेसोबत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षकही आता कोरोनयोद्धा म्हणून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जिल्ह्यातील चार हजार मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक सध्या कोरोनयोद्धाच्या भूमिकेत त्यांची जबाबदारी पार पाडतायत.
जिल्हा परिषदेचे चार हजार शिक्षक 'कोरोनायोद्धा', प्रशासनाच्या मदतीला हातभार
प्रशासकीय यंत्रणेसोबत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षकही आता कोरोनयोद्धा म्हणून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जिल्ह्यातील चार हजार मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक सध्या कोरोनयोद्धाच्या भूमिकेत जबाबदारी पार पाडतायत.
पेण तालुक्यातील खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हीणी या ठिकाणी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद असल्याने शिक्षक वर्ग घरीच आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक, मुख्यध्यापक यांना महामारीच्या काळात प्रशासनाच्या मदतीला घेण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे साधारण चार हजार मुख्यध्यापक आणि प्राथमिक शिक्षकांना नोंदी ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षात रुजू करण्यात आले आहे.
खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी चेकपोस्टवर हे शिक्षक सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये काम करतात. शिक्षकांकडून नोंदवण्यात येणाऱ्या माहितीमुळे जिल्हा प्रशासनाला लोकांचे ट्रेसींग करण्यात हातभार लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने दाखल होणाऱ्या व्यवस्थापनाबाबत चित्र स्पष्ट होत आहे. यासोबतच ग्रामीण स्तरावर कार्यान्वित करण्यात आल्येल्या करोना नियंत्रण समितीत देखील शिक्षक महत्वाची भूमिका बजावत आहेत.