रायगड- मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीजवळ एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असून तीघे गंभीर जखमी आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठाणेकडून मुबईकडे जाणारी प्रवासी चारचाकी वाहन मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत आली असता समोरून येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. हा अपघात आज रविवार (दि. 19 जाने.) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमरास घडला. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध