महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पनवेल महिला मृत्यूप्रकरण': चार फरार आरोपींनी बेड्या - panvel crime

पनवेल मधील दुंदरे या गावातील शारदा माळी (वय -55) या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, संबंधित मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली आहे.

panvel crime news
पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली आहे.

By

Published : Feb 8, 2020, 11:20 AM IST

नवी मुंबई- पनवेलमधील दुंदरे गावात मंगळसूत्र चोरल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपासात आत्महत्येची नोंद केली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

मात्र, संबंधित मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ते चौघेही फरार होते.

पनवेल मधील दुंदरे या गावातील शारदा माळी (वय -55) या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र महिलेला मारहाण करून गळफास दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. तसेच त्यांनी पाच संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. संबंधित संशयित गावातून फरार झाले होते. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली होती. त्यानुसार, पोलिसांनी हनुमान भगवान पाटील, गोपीनाथ विठ्ठल पाटील तसेच अलका गोपीनाथ पाटील आणि वनाबाई अर्जुन दवणे या चौघांना 17/2020, भा. द. वि. कलम -302, 306, 379, 504, 506, 34 नुसार अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details