महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले

नविद अंतुले यांना उशिरा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

नविद अंतुले
नविद अंतुले

By

Published : Apr 29, 2020, 2:55 PM IST

रायगड -महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांचे 28 एप्रिलला हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

नविद अंतुले
अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नविद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र असणाऱ्या नविद अंतुले यांच्या राजकारण प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, त्यांनी अचानक शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचारफेरीत भाग घेत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा हवा तसा प्रभाव पाडता न आल्यामुळे त्यांची अल्पायुषी राजकीय इनिंग अयशस्वी ठरली.

नविद अंतुले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

ABOUT THE AUTHOR

...view details