महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमध्ये गाढी नदी तुडुंब वाहू लागली; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले

शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले. गाढी नदीला आलेल्या पुरामुळे पनवेल शहरातील खाडीत अतिक्रमण करुन बांधलेल्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हविलण्यात आले.

पाणीच पाणी

By

Published : Jul 28, 2019, 11:54 AM IST

पनवेल - काही दिवसांपासून थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा जोर धरला. पावसामुळे गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा नदीचे पात्र भरून वाहू लागले. त्याचबरोबर परिसरातील नालेसुद्धा दुथडी भरुन वाहत होते. जोरदार पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागात पाणी साचले. काही भागात गुडघाभर पाणी साचल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. गाढी नदीला आलेल्या पुरामुळे पनवेल शहरातील खाडीत अतिक्रमण करुन बांधलेल्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हविलण्यात आले.

पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पाणीच पाणी


शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पनवेलमध्ये अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले. माथेरानच्या डोंगरातून उगम पावत पनवेल शहराजवळील खाडीला जावून मिळणारी गाढी नदी तुडूंब भरुन वाहते आहे.


वडघर आणि पनवेल शहराला जोडणाऱ्या गाढी नदीच्या पुलावरील पाण्याची पातळी वर येऊन पुलावरुन वाहु लागले. पनवेलपासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या उमरोली या गावाला गाढी नदी ओलांडून जावे लागते. त्यामुळे सरकारतर्फे २० वर्षापूर्वी येथे एक पूल बांधण्यात आला होता. हा पूल ग्रामस्थांना खूप उपयुक्त ठरतो. मात्र या पुलाची उंची खूपच कमी असल्याने मुसळधार पाऊस झाला की गाढी नदी तुडुंब वाहते आणि पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो. यामुळे उमरोली गावातील ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटतो. यावेळीदेखील आलेल्या जोरदार पावसामुळे गाढी नदीला पुराची स्थिती होती. पुराचे पाणी शहरातील खाडीत अतिक्रमण करुन बांधलेल्या झोपडपट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हविलण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details