रायगड -समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील २७७ बोटी १३ मे रोजी मच्छीमारीसाठी गेल्या होत्या. पुन्हा आज सकाळी १४ मे रोजी १७१ बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्या आहेत. जिल्ह्यातील ४४८ बोटी पैकी २२५ बोटी ह्या पुन्हा किनाऱ्याला लागल्या आहेत. मात्र अद्यापही १९३ मच्छीमार बोटी ह्या समुद्रातच आहेत. मात्र शासनाच्या निर्देशाकडून दुर्लक्ष करून जिल्ह्यातील अनेक बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्याची बाब समोर आली आहे. या सर्व बोटींना तत्काळ किनाऱ्यावर येण्याचे निर्देश मत्सव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत.
मच्छीमारांचे प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
हवामान विभागाने दिलेल्या दिलेल्या इशार्यानुसार १४ जानेवारीला ४० ते ५० किमी वेगाने, १५ तारखेला ताशी ४० ते ६० तसेच १६ तारखेला ताशी ६० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, समुद्र व खाडी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र वादळाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून रायगड जिल्ह्यातील अनेक मासेमारी नौका समुद्रात गेल्याची बाब समोर आली आहे.