रायगड - सध्या बाजारात मासळीचा मोठा तुटवडा भासतो आहे. जी मासळी सध्या उपलब्ध आहे ती प्रचंड महाग आहे. त्यामुळे खवय्यांचे हाल होत आहेत. जिभेचे चोचले पुरवणे कठीण झाले आहे. पापलेटची जोडी हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. परिणामी गजबजलेल्या मासळी बाजारात किरकोळ गर्दी पाहायला मिळते.
रायगडमध्ये मासळी महागल्याने खवय्यांचे हाल
मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले आहेत. अतिवृष्टी नंतर वादळांची मालिका यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमारांना बसला आहे.
मासळी महागल्याने खवय्यांचे हाल
हेही वाचा-लग्नाचा पहिला वाढदिवस : रणवीर दीपिका पोहोचले तिरुपती दर्शनाला
मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले आहेत. अतिवृष्टी नंतर वादळांची मालिका यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमारांना बसला आहे. अजूनही शेकडो बोटी रायगडच्या विविध किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन देखील अपेक्षित मासे मिळत नाहीत. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवणे कठीण झाले आहे.