रायगड - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूविषयी दहशत असताना श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील होम क्वारन्टाईनचे शिक्के असणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. क्वारन्टाईनचे शिक्के असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
होम क्वारन्टाईन असताना बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - रायगड कोरोना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारन्टाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींना शिक्के मारण्यात येत असून त्यांनी घरातून बाहेर जनमाणसात फिरण्यास बंदी केलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारन्टाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींना शिक्के मारण्यात येत असून त्यांनी घरातून बाहेर जनमाणसात फिरण्यास बंदी केलेली आहे. असे असताना श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील तीनजण नुकतेच परदेशातून परतले होते. सध्या त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली नसली तरी ते घराबाहेर फिरत आहेत.
परदेशातून आलेल्या या तिघांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी कलम 188 व 269 नुसार गुन्हा दाखल केला आहे. श्रीवर्धन तालुक्यात साधारणपणे 50 जण इतर देशातून गेल्या दोन महिन्यात आलेले आहेत अशी माहिती श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी दिली आहे.