महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापुरातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान - लॉजिस्टिक

ढेकू गावातील एसीपीएल लॉजिस्टीक कपंनीच्या गोदामाला रात्री अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले.

तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग

By

Published : May 17, 2019, 2:00 PM IST

रायगड - खालापूर तालुक्यातील ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग

ढेकू गावातील एसीपीएल लॉजिस्टीक कपंनीच्या गोदामाला ही आग लागली. आगीचे तांडव पाहून भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. खोपोली नगरपालिका, एचओसी, एचपीसीएल, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी अशा ५ अग्निशमन यंत्रणा तसेच खोपोली पोलीस व आयआरबी डेल्टाफोर्स या यंत्रणांनी ४ ते ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या आगीत कंपनीचे करोडोचे नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details