रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळ अंतोरेकडे जाणाऱ्या मार्गावर एका खत आणि भात बियाणाच्या दुकानाला आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत खत आणि बियाणे असे दोन्ही गाळे जळून खाक झाले आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पेणमध्ये खते आणि बियाणाच्या दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान - Fertilizers and seeds
या आगीत खत आणि बियाणाचे दोन गाळे जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पेण नगरपरिषद आणि जे. एस. डब्लू. कंपनीच्या अग्निशमन बंबानी २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पेण अंतोरे रस्त्यावर समर्थ खत एजन्सीचे दुकान आहे. याठिकाणी खत आणि बियाणे यांची विक्री केली जाते. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. आगीने रुद्ररुप धारण केल्याने दुकानातील खत आणि बियाणे जळून खाक झाली.
पेण नागरपरिषद व जे. एस. डब्लू. कंपनीच्या अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली. खरीप हंगाम तोंडावर असल्याने या दोन्ही दुकानांत खते आणि बियाण्यांचा साठा करून ठेवण्यात आला होता. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. परंतु शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.