रायगड -उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या भीषण आगीत 3 ओएनजीसी जवानांसह 1 कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. ओएनजीसी कंपनीतील डायरेक्टर जनरल मॅनेजर सी. एन. राव यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
सी. एन. राव (वय 50) निवासी प्लांट सुपरवायझर, कॅप्टन इरान्ना युनियाप्पा नायका (वय ४८) सीआयएसएफ जवान, सतीश प्रसाद कुशवाह (वय ३६) सीआयएसएफ जवान झारखंड, महेंद्रकुमार फिरंगीप्रसाद पासवान (वय ३३)- सीआयएसएफ जवान उत्तर प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. तर सीटी/फायर के. आर. महेश, सीटी/जीडी सिंधू राज अशी जखमींची नावे आहेत.