महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : नागोठणे बाजारपेठत गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

नागोठणे येथे मोदी पार्कमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे

By

Published : May 15, 2019, 11:44 PM IST

रायगड-नागोठणे येथे मोदी पार्कमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने विभागातील रिलायन्स आणि सुप्रीम पेट्रोकेम या कंपन्यांचे अग्निशमन दल तातडीने पाचारण करण्यात आले.

आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे

अग्निशमन दल येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. रिलायन्स व सुप्रीम पेट्रोकेमच्या दोन अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

सदरची आग कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीनंतर नागोठणे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details