महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणगाव स्फोट प्रकरण : क्रिपझो कंपनीच्या मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल - रायगड गुन्हे बातमी

क्रिपझो कंपनी ही आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणे तयार करते. आग विजवण्याचे प्रात्यक्षिक घेत असताना नेमकी ही दुर्घटना घडली. कंपनीच्या आवारात कच्चा माल साठवण करणारी एक खोली आहे. या ठिकाणी हे आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सुरु होते. या प्रात्यक्षिकासाठी मटेरीअल रुममध्ये आग लावण्यात आली होती. ही आग भडकल्यानंतर मटेरिअल रुममधील छतास असलेल्या नोझलमधून आग रोधक गॅसची फवारणी करण्यात आली. मात्र, आग कमी होण्याऐवजी अधिकच भडकली.

क्रिपझो कंपनीच्या मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल

By

Published : Nov 18, 2019, 7:31 PM IST

रायगड- माणगाव येथील क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटना प्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात अखेर 2 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. माणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

क्रिपझो कंपनीच्या मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल

माणगाव येथील विळे भागाड येथे असलेल्या क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला. तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले. या सर्वांवर नवी मुंबईतील बर्न सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्घटनेनंतर पोलीसांनी कंपनीचे मालक सुरेश शर्मा, संचालक अशोक कोटीयन आणि सचिन दरणे यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक आर. जे. इंगोले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - पनवेल-वसई मार्गावर लोकलच्या 170 फेऱ्या लवकरच धावणार

क्रिपझो कंपनी ही आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणे तयार करते. आग विजवण्याचे प्रात्यक्षिक घेत असताना नेमकी ही दुर्घटना घडली. कंपनीच्या आवारात कच्चा माल साठवण करणारी एक खोली आहे. या ठिकाणी हे आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सुरू होते. या प्रात्यक्षिकासाठी मटेरीअल रुममध्ये आग लावण्यात आली होती. ही आग भडकल्यानंतर मटेरिअल रुम मधील छतास असलेल्या नोझल मधून आग रोधक गॅसची फवारणी करण्यात आली. मात्र, आग कमी होण्याऐवजी अधिकच भडकली. बंद खोलीचा दरवाजा तोडून आगीचे लोट बाहेर पडले. या दुर्घटनेत खोलीच्या बाहेर असलेले 18 कामगार गंभीर जखमी झाले. यातील राकेश हळदे आणि आशिष येरूणकर या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

क्रिपझो कंपनीत डेमो करताना कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नव्हती. त्यामुळेच आग लागून 2 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. तर 16 जण उपचार घेत आहेत. आग विझविण्याचे उपकरण बनविणाऱ्या कंपनीतच कामगारांचे आगीपासून संरक्षण न झाल्याने कंपनीचे मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details