महाराष्ट्र

maharashtra

अखेर सुरेश लाड कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार

By

Published : Oct 3, 2019, 9:44 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी अर्थिक अडचण व आजारपणामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र, पुन्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आमदार सुरेश लाड

रायगड - जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आर्थिक अडचण व आजारपणामुळे निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. मात्र, पुन्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवणार असून आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सुरेश लाड यांनी कर्जत राष्ट्रवादी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे ना-ना करता करता सुरेश लाड यांच्या निवडणूक न लढण्याच्या नाटकावर अखेर पडदा पडला आहे.

हेही वाचा - अलिबागमधून काँग्रेस उमेदवार कोण ?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुरेश लाड यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, आजार पणामुळे व आर्थिक विवंचनेत असल्यामुळे निवडणूक लढणार नसल्याचे लाड यांनी पक्षाला कळविले होते. त्यांच्या या निर्णयानंतर लाड हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शिवसेनेकडून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

आमदार सुरेश लाड

हेही वाचा - उरणमध्ये युतीत बिघाडी : भाजपच्या महेश बालदींचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

आपण निवडणूक लढविणार नसल्याचे समजल्यावर कार्यकर्ते आग्रह धरीत होते. आजार पणामुळे मी चार दिवस उपचार घेत होतो. मात्र, कार्यकर्ते व संघटन हे दैवत असून मी निवडणूक लढविणार असल्याचे सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेर जाहीर केले. सुरेश लाड यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी कर्जत खालापूरमध्ये सहानुभूती निर्माण केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details