महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांची भात शेतीकडे पाठ; तर शेततळ्यांना पसंती - left paddy fields

रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील अनेक शेतकरी भातशेती ( Pen taluka, known as the paddy warehouse ) सोडून ( left paddy fields ) आता शेततळ्यांकडे वळाले आहेत. भातशेती करताना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आणि मेहनत लागत असल्याने शेतकऱ्यांची आपोआपच पावले तळे खोदण्याकडे वळाली आहेत.

Farms
शेततळे

By

Published : Jul 9, 2022, 2:50 PM IST

पेण-रायगड : रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील ( Pen taluka, known as the paddy warehouse ) अनेक शेतकरी भातशेती सोडून ( left paddy fields )( Pen taluka, known as the paddy warehouse ) आता शेततळ्यांकडे वळाले आहेत. भातशेती करताना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आणि मेहनत लागत असल्याने शेतकऱ्यांची आपोआपच पावले तळे खोदण्याकडे वळाली आहेत.

शेतकरी वळताहेत शेततळ्याकडे :मागील अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेला खारेपाट भाग जो शेतीसोबत मासेमारी करणारा आहे. एकीकडे कोकणात शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय जरी वेगवेगळा असला तरी त्यावेळी सत्तर टक्के शेती व्यवसाय करणारे शेतकरी आणि तीस टक्के मासेमारी करणारे आहेत. मात्र, आता हे गणित बिघडले असून सद्य:स्थितीला जवळपास साठ टक्के शेतकरी मासेमारी व्यवसायाकडे वळू लागले आहेत. मागील काही वर्षांचा विचार केला तर सतत घडत असणारे वातावरणातील बदल आणि वर्षभरात कधीही येणारा पाऊस या बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्याचे अंदाज चुकत आहे. परिणामी मेहनत करून केलेली भातशेती फुकट जात आहे.

भात पिकाला खर्च अधिक : शेतीची मशागत, पेरणी, लावणी, कापणी, झोडणी करून शेतात पिकवलेले सोन्यासारखे भात घरामध्ये नेईपर्यंत यासाठी हजारो रुपये खर्च होत असून यासाठी मेहनतही खूप करावी लागत आहे. मात्र, शेतीसाठी जो खर्च होतो तो खर्चसुद्धा निघत नाही तर बऱ्याच वेळा कामासाठी कामगारही मिळत नाहीत. अनेकदा कामगारांसाठी भरमसाठ मजुरी भरावी लागते. या सर्व गोष्टींमुळे भातशेती करणारा शेतकरी या शेती व्यवसायाला कंटाळला असून त्याऐवजी आपल्याच शेतात शासनाच्या असणा-या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेततळी खोदून लाखो रुपये उत्पन्न घेणे पसंत करीत आहेत.

अनेक शेतकरी घेत आहेत शेततळे योजनेचा लाभ : मागील तीन वर्षांत पेण तालुक्यात दरवर्षी दोनशे ते तीनशे हेक्टर शेती लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे. यात तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाच्या शेततळ्यांच्या योजनांचा फायदा घेऊन मत्स्यव्यवसाय करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील बरेच शेतकरी आता भातशेतीचा खर्च परवडणार न झाल्याने शेततळ्यांकडे वळाले आहेत.


भात क्षेत्र होतेय कमी : दरवर्षी शंभर ते दोनशे हेक्टर शेतजमीन ही भाताची लागवड कमी होत आहे. शासनाच्या योजनांद्वारे शेततळ्यातुन चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी शेततळी तयार केली आहेत. शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना याबाबत लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती बरोबर शेततळ्यांच्या योजनांचा जी फायदा घ्यावा.

हेही वाचा : CM Eknath Shinde Meet Amit Shah : शिंदेंनी घेतली शहांची भेट; मंत्रीमंडळ वाटपाबाबत चर्चा

हेही वाचा : On Occasion of Ashadi Ekadashi 2022 : आषाढीनिमित्त वारकऱ्यांसाठी टोलमाफी सुरू; वाहतूक पोलिसांकडून विशेष स्टिकर्सची सोय

ABOUT THE AUTHOR

...view details