महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध - pen midc news

या भुसंपादनामुळे शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत असल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे या भुसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे भुसंपादन रद्द करावे, अशा हरकती उपविभागिय अधिकारी कार्यालय पेण येथे शेतकऱ्यांनी नोदविल्या असताना आम्हाला विश्र्वासात न घेता हा प्रकल्प लादला आहे.

farmers strongly oppose maharashtra industrial development corporations land acquisition census at pen in raigad
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By

Published : May 31, 2022, 8:38 PM IST

पेण (रायगड) -महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव - गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट या गावातील जमिन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असुन कोलवे या ठिकाणी शेतक-यांनी एकत्र जमुन या मोजणीला विरोध केला आहे. या वेळी रायगड जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, निलेश म्हात्रे, विजय पाटील, सुशील कोठेकर, राजू पाटील, महेश पाटील, महेंद्र कोठेकर, गजानन पेढवी, प्रवीण म्हात्रे, प्रभाकर पाटील आदीसह शेकडोंच्या संख्येने शेतकरी, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

नोटीस शेतकऱ्यांनी स्वीकारल्या नाहीत - या प्रकल्पातील खारजांभेळा, खारचिर्बी, खारढोंबी या गावातील जमीनी शासनाने भुसंपादनातुन वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी कोलवे, बेणेघाट, वावे, डोलवी, काराव, खारमांचेळा, खारकारावी या गावातील जमीन या प्रकल्पासाठी संपादीत करण्यात येणार असल्याने या संर्भातील जमीन मोजणी सदर्भातीह नोटीस येथील शेतकऱ्यांना देण्यात आली. या नोटीस शेतकऱ्यांनी स्वीकारल्या नाहीत तर कोलवे येथे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमुन या मोजणीस विरोध केला. ज्या प्रमाणे तीन गावे वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याच प्रमाणे या प्रकल्पातील सर्व गावे भुसंपादनातुन वगळुन हा प्रकल्पच शासनाने रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

भुसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध - या भुसंपादनामुळे शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत असल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे या भुसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे भुसंपादन रद्द करावे, अशा हरकती उपविभागिय अधिकारी कार्यालय पेण येथे शेतकऱ्यांनी नोदविल्या असताना आम्हाला विश्र्वासात न घेता हा प्रकल्प लादला आहे. विधानपरिषदेत या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शासनाकडे केली असल्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी आक्रमक झाले असल्याने शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता मोजणीचे अधिकारी कोलवे या गावात आलेच नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details