रायगड -रायगड जिल्ह्यात फार्मपार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी मुरुड व रोहा तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. असे असूनही प्रशासनाचे अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहेत. भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असल्यमुळे भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) त्यास विरोध आहे. त्यामुळे सरकाने भूसंपादन मागे घ्यावे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग तुषार विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
'अधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल देत आहेत'
प्रस्तावित फार्मपार्क प्रकल्पाकरीता भूसंपादन करण्यासाठी मुरुड, रोहा, अलिबाग तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यासाठी 32/2च्या नोटीस बजावण्यात आल्या. त्यास 50 टक्क्यांपेक्ष्या जास्त खातेदारांनी हरकती नोंदवून जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. असे असूनही शेतकऱ्यांच्या हरकती लपविल्या जात आहेत. प्रांताधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल पाठवत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असूनही भूसंपादन लादले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा कट आहे, असा आरोप मोहिते यांनी केला.
शेतकरी, मच्छीमारांचा आहे विरोध