पेण (रायगड) -आमदार जयंत पाटील यांनी (MLA jayant patil on proposed Dolvi MIDC) शेतकरी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांचा नियोजित डोलवी एमआयडीसी प्रकल्पास विरोध आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशनात सरकार समोर शेतकऱ्याची बाजू मांडताना येथील स्थानिकांना विश्वासात घेवून येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करून विकास केला जावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे पेण येथील शेतकऱ्यांच्या विरोधापुढे राज्य सरकार नरमणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून एमआयडीसी विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार असल्याचे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
प्रस्तावित डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या (Dolvi MIDC Struggle Committeeon) वतीने 11 गावातील शेतकरी व ग्रामस्थांचा एमआयडीसी भुसंपादन रद्द करावे या प्रमुख मागणीसह व खारेपाण्याने भिजलेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी, जेएसडब्लू कंपणीमुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास यावर नियंत्रण असावे. इतर मागण्या घेवून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला होता. बाधित 11 गावच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पेण रोहा तालुक्यातील अनेक शेतकरी तशेच ग्रामस्थ विशेषत: कासु विभागातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी काळाची पावलं ओळखून मोठ्या प्रमाणात मोर्चात सामील होऊन पाठिंबा दिला. या मोर्चात अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची शेतकरी प्रतिनिधीनी सदिच्छा भेट घेतली.