रायगड- नागोठणे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन जणांना स्थानिक ग्रामस्थ व नागोठणे पोलिसांनी रबरी ट्यूबच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. भगवान श्रावण जाधव (वय ३०), भारती भगवान जाधव (वय २० रा. धोबेवाडी, पाचापूर, ता. सुधागड) असे वाचविलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या राहण्याची व खाण्याची सोय नागोठणे पोलिसांनी केली आहे.
अंबा नदीच्या पुरात अडकलेल्या दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थ, पोलिसांना यश - अंबा नदीच्या पुरात अडकलेल्या दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थ व पोलिसांनी यश
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर असल्याने नागोठणे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून पाणी बाजारपेठेत घुसले होते. दरम्यान, चिकणी गावच्या हद्दीत गुलमोहर हॉटेलच्या मागच्या बाजूला नदीच्या जवळ जाधव दाम्पत्याचे घर आहे. अंबा नदीला पूर आल्याने जाधव यांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे ते तेथेच अडकले. पोलीस व गावकऱ्यांच्या साहाय्याने त्यांना वाचविण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर असल्याने नागोठणे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून पाणी चिकणी बाजारपेठेत घुसले होते. दरम्यान, चिकणी गावच्या हद्दीत गुलमोहर हॉटेलच्या मागच्या बाजूला नदीजवळ जाधव दाम्पत्याचे घर आहे. अंबा नदीला पूर आल्याने जाधव यांच्या घरात पुराचे पाणी शिरले. चारी बाजूला पाणी असल्याने जाधव दाम्पत्य पुराच्या पाण्यात अडकले होते.
हे दोघे पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर साई मोहन राठोड व लोकेश शिवा नायक या स्थानिक तरुणांनी पोलिसांच्या मदतीने पोहत जाऊन भगवान जाधव व भारती जाधव यांना सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. रबरी ट्युबच्या साहाय्याने या दोघांना बाहेर काढण्यात आले होते. यावेळी नागोठणे पोलीस निरीक्षक डी. एस घुटुकडे, पोलीस निरीक्षक साबळे, कल्याण शाखा रायगड, हवालदार महाडिक, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस शिपाई सुतार यांनी बचाव कार्य केले.