महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Explosion In Raigad : जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट.. दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी - रायगडमध्ये स्फोट

रायगडच्या महाड तालुक्यात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करत असताना स्फोट होऊन दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले ( Explosion In Raigad ) आहेत. या पोलिसांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले ( Two policemen were seriously injured ) आहे.

जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट.. दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट.. दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

By

Published : Mar 8, 2022, 10:49 PM IST

रायगड : महाड तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करत असताना झालेल्या स्फोटात ( Explosion In Raigad ) दोन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले ( Two policemen were seriously injured ) आहेत. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात ( Mahad Rural Hospital ) प्राथमिक उपचार करून, मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगड खाणीत नष्ट करताना अपघात झाला.

मुद्देमाल नष्ट करण्याचे होते आदेश

मिळालेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार कांबळे तर्फे महाड येथील एका दगड खाणीत हा मुद्देमाल नष्ट करत असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अलिबाग येथून आलेले तीन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. राहुल दोशी, रमेश कुटे, आशीर्वाद लगदे अशी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

परिसरातील गावांना बसले हादरे

या स्फोटामुळे परिसरातील कांबळे तर्फे महाड, आकले भोराव या गावामध्ये मोठे हादरे बसले. या धक्क्याने गावातील घरेदेखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. आवाज होताच गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड, तहसीलदार सुरेश काशीद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. सदर घटना घडत असताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या की नाही याबाबत स्थानिक नागरिकांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details