रायगड - परंपरागत शेतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेतीतही उत्पन्न मिळत असल्याचे रायगड जिल्ह्यातील एका 56 वर्षाच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. हिफझुर फकीह असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
म्हसळा तालुक्यातील वरवठणे (मुजफ्फर नगर) येथील शेतकरी हिफझुर फकीह यांना त्यांच्या वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इस्त्राईल पद्धतीचा वापर करून शेती केली आहे. फकीह यांनी पहिल्या बारा गुंठ्यात बेड आणि ठिबक सिंचनाचा वापर करून आल्याची शेती केली. फकीह यांनी केलेला आल्याच्या शेतीचा प्रयोग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. याच पद्धतीने आणखी बारा गुंठ्यात कलिंगडाची लागवड केली. फकीह यांना एकूण चोवीस गुंठ्यातील आले आणि कलिंगडच्या शेतीसाठी अडीच लाख रूपये खर्च आला. शेतीतून आठ टन आले आणि पाच टन कलिंगडाचे उत्पादन मिळण्याची फकीह यांना खात्री आहे.बाजार भावानुसार या उत्पादनाची मिळकत दहा लाख रुपये होईल, असे फकीह यांनी संगितले.