महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सोडा, माजी आमदार जगताप यांची मागणी - कोरोना बातमी

ज्या प्रमाणे परप्रांतियांसाठी विशेष रेल्वे शासनाकडून सोडण्यात येते त्याप्रमाणे कोकणातही काही रेल्वे मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात यावी, अशा मागणीचे पत्र माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देताना माजी आमदार जगताप
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देताना माजी आमदार जगताप

By

Published : May 13, 2020, 3:44 PM IST

Updated : May 13, 2020, 7:26 PM IST

रायगड - मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना रायगडसह कोकणात विशेष रेल्वेने पोहोचवा, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेण आणि महाडमध्ये कोव्हिड रुग्णालय तयार करा, अशी मागणी महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मागणीचे पत्र दिले आहेत.

तसेच माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या दोन महिन्याची पेन्शन म्हणजेच असा एक लाखांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. चाकरमान्यांना आणण्यासाठी मी तसेच जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी हे सहकार्य करतील, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

माजी आमदार माणिक जगताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शासनाने जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील लाखों चाकरमानी हे मुंबईत अडकले आहेत. असे असताना अनेक लाखो चाकरमानी हे जिल्ह्यात पायी चालत आले आहेत. तरी अजून अनेक चाकरमानी हे अडकले आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाकरमानी हे घाबरले असून त्याच्या खाण्यापिण्याची गैरसोय होत आहेत. अनेकजण मुंबईत लहानशा खोलीत आठ-दहा जण राहत आहेत. स्वच्छतागृहही सार्वजनिक असल्याने कोरोनाची भीती आहे. एकीकडे परराज्यातील नागरिकांना शासन रेल्वेने त्याच्या गावी पाठवत आहेत. त्याचप्रमाणे चाकरमान्यांनाही त्याच्या गावी पाठविण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून त्यांना विशेष रेल्वेने त्वरित पाठवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे.

जिल्ह्यात पनवेल, उरण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून जिल्ह्यातील काही भागातही रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे एमजीएम, तसेच कोव्हिड रुग्णालयांवर ताण पडत आहे. यासाठी पुढच्या दृष्टीने पेण आणि महाडमध्ये कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्याची मागणीही जगताप यांनी केली आहे.

हेही वाचा -कर्नाटक, गोंदिया आणि रावेर मधील मजुरांना घेऊन विशेष बस रवाना...

Last Updated : May 13, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details