पनवेल - राज्य विजवितरण कंपनीच्या तळोजा विभागातील एका सहायक अभियंत्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. महेश पांडुरंग सावंत, असे या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.
पनवेलमध्ये राज्य विजवितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला ५० हजारची लाच स्वीकताना अटक - 50 thousand
तक्रारदाराने राज्य विजवितरण कंपनीच्या तळोजा विभागात नवीन इमारतीतील सदनिकांना मंजूर झालेले इलेक्ट्रिक मीटर ताब्यात मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी सहायक अभियंता महेश सावंत याने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली होती.

दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करण्यात आल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना महेश सावंतला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.