रायगड -कर्जत तालुक्यातील खांडस येथील दुर्गम भागात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने आपल्याच गावात राहणाऱ्या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली आहे. पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून मुलगी भावाबरोबर अंगणात खेळत असल्याचा फायदा घेत. या मुलाने मुलीला घरात बळजबरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या 16 वर्षीय (विधी संघर्षग्रस्त) मुलावर नेरळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल -