खालापूर (रायगड) - जुन्या महामार्गाने पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जात असणाऱ्या एका आयशर टेम्पोचा ब्रेक फेल होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. खोपोलीकडे जात असताना शिंग्रोबा मंदिराजवळ तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाला. तो अनियंत्रित झालेला टेम्पो समोरील डोंगराला धडकून उलटला. या अपघातमध्ये चौघे जण गंभीर जखमी, तर २ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच टेम्पोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने डोंगराला धडकला आयशर टेम्पो; ४ गंभीर - बोरघाटात टेम्पोचा ब्रेक फेल
पुण्याहून मुंबईकडे वायसरचा माल घेऊन जाणार आयशर टम्पो बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळील खिंडीत आला असता, अचानक त्याचा ब्रेक फेल झाला. त्यावेळी चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने घाटात टेम्पोने समोरील डोंगराला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो पलटी झाला. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तत्काळ या या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
शिंग्रोबा मंदिराजवळील खिंडीत टेम्पोचा ब्रेक फेल -
पुण्याहून मुंबईकडे वायसरचा माल घेऊन जाणार आयशर टम्पो बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळील खिंडीत आला असता, अचानक त्याचा ब्रेक फेल झाला. त्यावेळी चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने घाटात टेम्पोने समोरील डोंगराला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो पलटी झाला. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तत्काळ या या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या अपघाताची माहिती मिळतात बोरघाट महामार्ग टीम, खोपोली बिट मार्शल टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने टेम्पो मध्ये अडकेल्या जखमींना बाहेर काढले. त्यापैकी चौघांना गंभीर इजा झाली होती. तर दोनजण किरकोळ जखमी झाले होते. या सहाही जणांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. त्यानंतर हा अपघातग्रस्त टेम्पो हटवण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली.