महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निरव मोदीनंतर वाधवान यांचाही बंगला होणार का जमीनदोस्त ? - वाधवान यांच्या फार्म हाऊसवर छापा

रायगड मधील सारंग वाधवान यांच्या अलिबाग तालुक्यातील आवस धोकवडे येथील इंद्र पै नगराती पार्म हाऊस सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहे. या फार्म हाऊसवर ईडीने छापा टाकला.

वाधवान यांचा बंगला

By

Published : Oct 9, 2019, 8:01 AM IST

रायगड -पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकरणात अडकलेले एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश व सारंग वाधवान यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास धोकवडे येथील इंद्र पै नगरातील फार्म हाऊसवर ईडीने शनिवारी छापा टाकला. ईडीने या कारवाईत वाधवान यांच्या फार्म हाऊस मध्ये बांधलेले दोन आलिशान बंगले सील केले आहेत. वाधवान यांनी हा फार्म हाऊस सीआरझेडचे उल्लंघन करून बांधलेला असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनही नोटीस दिलेली आहे. मात्र, तूर्तास वाधवान यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवलेली आहे. ईडीच्या कारवाईनंतर निरव मोदी प्रमाणे वाधवान यांचाही बंगला जमीनदोस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाधवान यांचा बंगला

अलिबाग तालुक्यात आवास ग्रामपंचायत हद्दीत इंद्र पै परिसरात राकेश व सारंग वाधवान यांचा फार्म हाऊस आहे. 95, 96, 97 सर्व्ह नंबरची ही मालमत्ता आहे. चार एकरात वाधवान यांनी आलिशान दोन बंगले बांधले असून 22 अद्यावत खोल्या बांधल्या आहेत. या बंगल्याचा अतिभव्य असा परिसर असून समोरच विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे. बंगल्याच्या चारी बाजूला भिंतीचे काम करण्यात आलेले आहे. बंगल्याच्या खाली परिसरात एक नौका ठेवली आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या अनियमिततेमुळे आरबीआय बँकेने बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध आणले आहेत. त्यामुळे लाखो ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. मात्र, असे असताना बँकेचे प्रवर्तक रमेश व सारंग वाधवान यांनी स्वतःची तुंबडी भरून करोडोची माया जमवून संपत्ती गोळा केली आहे.

सक्त वसुली संचलनालाय विभागाने शनिवारी वाधवान बंधूंच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. वाधवान यांच्या बंगल्यातील ही कारवाई दोन दिवस सुरू होती. सक्त वसुली संचलनालाय अधिकाऱ्यांनी वाधवान यांच्या फार्म हाऊस मधील दोन बंगल्याना व आतील खोल्याना सील केले आहे. बंगल्याच्या दरवाज्यावर नोटीस लावण्यात आलेली आहे. बंगल्यात कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. स्थानिक 14 सुरक्षा रक्षक व 25 कर्मचारी सध्या बंगल्यात आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांवरही लवकरच घरी बसण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details