रायगड - अच्छे दिनाचे स्वप्न सामान्य जनतेला दाखवले आणि नंतर तो चुनावी जुमला आहे, असे सांगून सामान्याच्या दुखावर डाग दिले ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे, अशी टीका शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून चुनावी जुमला म्हणणे ही लोकशाहीची क्रूर चेष्टा - डॉ. अमोल कोल्हे - भाजप
रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाडच्या चांदे क्रीडांगणावर डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते.
रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाडच्या चांदे क्रीडांगणावर डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते. जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आल्यानंतर ते मान्य करण्याची नैतिकता नाही तुम्ही जनतेचा विश्वासघात करता, पण सामान्य माणसाला कमी लेखू नका, असा इशारा डॉ. कोल्हे यांनी दिला.
भाजपचे सरकार नालायक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे करतात तेव्हा त्याच सरकारमधील शिवसेनेचे मंत्री कुठल्या व्याख्येमध्ये बसतात. नालायकांच्या परीभाषेत त्यांचे स्थान काय? असा सवाल सुनील तटकरे यांनी यावेळी केला. मोदींच्या विरोधामुळे आपण कोकणात प्रकल्प आणू शकलो नाही, असे आजवर सांगणाऱ्या अनंत गीते यांनी हे धाडस आता भाजप कार्यकर्त्यांसमोर करावे, असे आव्हान तटकरे यांनी दिले. कोकणातील प्रकल्पांना मोदींचा विरोध होता हे गीतेंनी आता पुन्हा जाहीर करावे, असे आव्हानही अनंत गीते यांना तटकरे यांनी दिले.