महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेएनपीटी बंदरातून डबल डेकर मालवाहतूक रेल्वे सेवेचा शुभारंभ - jnpt port news

जेएनपीटी बंदरातून डबल डेकर माल वाहतूक रेल्वे सेवा सुरू केल्याने बंदराच्या व्यापारात मोठे बदल होणार आहेत. ‘डॉर्फ’ कंटेनर एकावर एक ठेवून माल वाहतूक केल्याने 67% अधिक मालाची वाहतूक केली जाते तसेच 40 टन क्षमतेच्या आयएसओ कंटेनरच्या तुलनेत ‘डॉर्फ’ कंटेनर मधून 71 टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते.

जेएनपीटी बंदरातून डबल डेकर मालवाहतूक रेल्वे सेवेचा शुभारंभ
जेएनपीटी बंदरातून डबल डेकर मालवाहतूक रेल्वे सेवेचा शुभारंभ

By

Published : Mar 8, 2021, 9:16 AM IST

रायगड : गुजरातमधील मेहसाणा ते जेएनपीटी बंदरापर्यंत डबल स्टॅक्ड डॉर्फ कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डबल स्टॅक्ड डॉर्फ कंटेनरच्या पाच वॅगनसह ट्रेन सकाळी रविवारी 11:30 वाजता जेएनपीटी बंदरात दाखल झाली आणि दुपारी एक वाजता परत रवाना झाली.
जेएनपीटी बंदराच्या व्यापारात होणार बदल
जेएनपीटी बंदरातून डबल डेकर माल वाहतूक रेल्वे सेवा सुरू केल्याने बंदराच्या व्यापारात मोठे बदल होणार आहेत. ‘डॉर्फ’ कंटेनर एकावर एक ठेवून माल वाहतूक केल्याने 67% अधिक मालाची वाहतूक केली जाते तसेच 40 टन क्षमतेच्या आयएसओ कंटेनरच्या तुलनेत ‘डॉर्फ’ कंटेनर मधून 71 टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते. त्याचबरोबर भारतीय रेल्वेकडूनही आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅक्ड डॉर्फ कंटेनर गाड्यांसाठी अतिरिक्त मालवाहतूकीसह मालवाहतूक शुल्कात 17% सवलत दिली गेली आहे. जेएनपीटी बंदरात “डेडिकेटेड डॉर्फ कंटेनर डेपोचे(डी-डेपो) “व्यवस्थापन, देखभाल आणि संचालन” करण्यासाठी ऑपरेटरची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या डेपोमध्ये आयएसओ एक्झिम कंटेनर डिस्टफ्ड/रीस्टफ्ड केले जातील आणि नंतर जेएनपीटीकडे किंवा जेएनपीटीतुन बाहेर रेल्वेने पाठविण्यासाठी डॉर्फ कंटेनरमध्ये पुन्हा रीस्टफ्ड केले जातील.
संकल्पना गेम चेंजर ठरणार
डॉर्फ कंटेनरची संकल्पना मालवाहतूक क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण डॉर्फ कंटेनर एकावर एक ठेवून आयात-निर्यात मालाची रेल्वेद्वारे वाहतूक केल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच जेएनपीटीमध्ये रेल्वेच्या वाहतूकीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details