रायगड (पनवेल) - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा 35 पर्यंत आला आहे. पनवेलमध्ये एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरकडून उपचार घेणाऱ्या काही व्यक्तींचे अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पनवेलमध्ये डॉक्टरला कोरोनाची बाधा; कोरोनाबाधितांची संख्या ३५ - Panvel Corona Update
पनवेलमध्ये एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरकडून उपचार घेणाऱ्या काही व्यक्तींचे अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या ३५ झालीआहे.
नवी मुंबईच्या तुलनेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे. या अगोदर पाच आणि सोमवारी आणखी दहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी दिली. यामध्ये खारघर मधील 1, उलव्यातील तीन आणि कळंबोलीमधील केंद्रीय सुरक्षा दलाचे 6 जवान कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तो पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते.
खांदा कॉलनीमधील अष्टविनायक हॉस्पिटलच्या 54 वर्षीय डॉक्टरचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी ज्या व्यक्तीचे उपचार केले होते त्यांचेही कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या डॉक्टरच्या सहवासात असलेल्या तसेच 15 दिवसात ज्यांनी या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत त्यांनी महानगरपालिकेला संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.