महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे सुरू असलेल्या निर्जंतुकीकरणामुळे डेंगू, हिवताप आजार नियंत्रणात येणार - वैशाली पाटील - जिल्हा हिवताप अधिकारी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कीटकजन्य रोगाचे संकटही तेवढेच धोकादायक आहे. परिसरातील अस्वच्छता, पाणी साठवून ठेवणे, ठिकठिकाणी पाणी साचणे यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य रोगांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे डेंगू, हिवताप यासारखे कीटकजन्य आजार नागरिकांना होण्याची भीती असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन हे वेळोवेळी परिसर निर्जंतुकीकरण करत असल्याने यावेळी डेंगू, हिवतापासारखे आजार वाढण्याची शक्यता कमी आहे.

Rai
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील

By

Published : May 25, 2020, 8:18 PM IST

रायगड- कोरोनाचे संकट सध्या सगळीकडे पसरले असले, तरी येणाऱ्या पावसाळी हंगामात डेंगू, हिवताप यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात डेंगूचे जानेवारीपासून तीन रुग्ण असून हिवतापाचे 22 रुग्ण आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन हे वेळोवेळी परिसर निर्जंतुकीकरण करत असल्याने यावेळी डेंगू, हिवतापासारखे आजार वाढण्याची शक्यता कमी असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील

एकीकडे कोरोनाचे संकट असले, तरी दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कीटकजन्य रोगाचे संकटही तेवढेच धोकादायक आहे. परिसरातील अस्वच्छता, पाणी साठवून ठेवणे, ठिकठिकाणी पाणी साचणे यामुळे पावसाळ्यात कीटकजन्य रोगांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे डेंगू, हिवताप यासारखे कीटकजन्य आजार नागरिकांना होण्याची भीती असते. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना परिसरात स्वच्छता राखण्याचे, पाणी साठवून न ठेवण्याचे तसेच पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचे आवाहन करत असते. तसेच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून गावातील, शहरातील स्वच्छता, फवारणी पावसाळ्यापूर्वी करून घेतली जाते. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण काम सुरू झाले आहे. त्यामुळे गावात, शहरात सर्व रस्ते, अस्वच्छ परिसर हा निर्जंतूक केल्याने कीटकजन्य आजाराचे प्रमाण घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कोरोनासोबत येत असलेले कीटकजन्य आजाराच्या रुग्णाचे रक्त नमुनेही तपासणीसाठी पाठविले जात असल्याने त्यादृष्टीने खबरदारीची पावले आरोग्य यंत्रणेकडून उचलली जात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.

'ती' तापाची साथ डेंगू सदृश्य नाही

अलिबाग तालुक्यातील रेवस गावात काही दिवसांपूर्वी आलेली तापाची साथ ही डेंगू सदृश्य नसली, तरी तेथील नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली असून ते निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात जानेवारीपासून आजतायगत 3 डेंगू आणि 22 हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. तरी पावसाळ्यात नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नागरिकांना आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहनही डॉ. वैशाली पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details