महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनी जंजिरा गडावरील निर्बंध उठवले, किल्ला पर्यटनास खुला - मुरुड-जंजिरा पर्यटन निर्बंध न्यूज

मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यास 'फक्त 400 पर्यटकांना परवानगी' ही अट रद्द करून सर्वांना किल्ला पर्यटनासाठी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. कोरोना संकट असल्याने खबरदारी म्हणून रोज 400 पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यास मिळेल, अशी परवानगी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी होती.

जंजिरा किल्ला पर्यटन न्यूज
जंजिरा किल्ला पर्यटन न्यूज

By

Published : Jan 12, 2021, 4:36 PM IST

रायगड - मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यास 'फक्त 400 पर्यटकांना परवानगी' ही अट रद्द करून सर्वांना किल्ला पर्यटनासाठी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जंजिरा किल्ला हा सर्व पर्यटकांना खुला झाल्याने स्थानिक व्यवसायिक आणि पर्यटक आनंदित झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जंजिरा गडावरील निर्बंध उठवले, किल्ला पर्यटनास खुला
400 जणांना होती किल्ल्यात जाण्यास परवानगीमुरुड तालुक्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे जंजिरा किल्ला आहे. हजारो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यास नेहमी येत असतात. त्यामुळे राजपुरी येथे मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते. त्यातच कोरोना संकट असल्याने खबरदारी म्हणून रोज 400 पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यास मिळेल, अशी परवानगी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी होती.

हेही वाचा -दिलासादायक : भूमाफियांच्या विरोधातील तक्रारींवर गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना



वाहतूक सोसायटीच्या चालक मालकांनी केले काम बंद आंदोलन

जिल्हाधिकारी यांनी घातलेली 400 पर्यटकांच्या परवानगीची अट ही जाचक असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे होते. अखेर येथील बोट चालक, मालक यांनी काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे जंजिरा किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावरूनच किल्ल्याचे दर्शन घेऊन परतावे लागत होते. त्यामुळे पर्यटकही नाराज होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

जंजिरा किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना बोट जाण्यास उपलब्ध नसल्याने किल्ला न बघता माघारी फिरावे लागत होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी किल्ल्यावरील निर्बंध हटवून पर्यटकांसाठी किल्ला बघण्यास खुला केला आहे. कोविडच्या नियमाचे पालन करून पर्यटकांना किल्ला पाहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा पर्यटकांची पावले जंजिऱ्याकडे वळू लागली आहेत.

हेही वाचा -भांडणानंतर घरातून निघून आली पश्चिम बंगालची तरुणी, आईवडिलांचा शोध घेत दिले ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details