महाराष्ट्र

maharashtra

रायगड : कोल्हारे ग्रामपंचायतीकडून मच्छिमारांना साहित्य वाटप

By

Published : Jun 9, 2021, 7:44 PM IST

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक मच्छिमारांना ग्रामपंचायतीकडून मासेमारीचे जाळे यासारखे साहित्य वाटप करण्यात आले आहे.

रायगड : कोल्हारे ग्रामपंचायतीकडून मच्छिमारांना साहित्य वाटप
रायगड : कोल्हारे ग्रामपंचायतीकडून मच्छिमारांना साहित्य वाटप

रायगड - कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक मच्छिमारांना ग्रामपंचायतीकडून मासेमारीचे जाळे यासारखे साहित्य वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तर ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

मच्छिमारीतून अनेकांच्या कुटुंबाचा चालतो उदरनिर्वाह
कर्जत तालुक्यातील नेरळ शहराला लागून असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक आदिवासी, स्थानिक मच्छीमार असून नदी, ओढा अशा भागात छोट्या स्वरूपात मच्छीमारी करायची त्यातून मिळणाऱ्या शे - दोनशे रुपयातून त्याता उदरनिर्वाह होत असतो.

सरपंच महेश विरले यांचा पुढाकार
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाउनचा फटका अशा हातावर कमवणाऱ्या कुटुंबाना मोठ्या प्रमाणात बसला होता. तेव्हा पावसाळ्याच्या तोंडावर मासेमारीसाठी त्यांच्याकडे तत्सम साहित्य घेण्याची सुद्धा वानवा होती. त्यामुळे अशा स्थानिक मच्छिमारांना मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण होती. ही गरज ओळखत येथील सरपंच महेश विरले यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीतील मच्छिमारांना तंगूस जाळे, आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे. सुरुवातीला धामोते येथील ३५ मच्छिमारांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील इतर मच्छिमारांना सुद्धा साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे सरपंच विरले यांनी सांगितले आहे. विरले यांनी या मदतीचा हात पुढे केल्याने सर्वानी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उपसरपंच अस्मिता विरले, सदस्य रोशन म्हसकर, गीता गणेश मोरे, शिवसेना शाखाप्रमुख जानू पेरणे, उपशाखाप्रमुख पांडुरंग हरड, मधुकर विरले, महादेव विरले, धर्मा दळवी, बाळाराम पेरणे, पपेश विरले, सोमनाथ विरले, भरत पेरणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details