महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिझेलची तस्करी; 39 जणांच्या मुसक्या आवळल्या, 7 कोटी 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

परदेशातून येणाऱ्या जहाजांतून आणि धरमतर खाडीत मालवाहतूक करणाऱ्या बार्जेसमधून ही टोळी डिझेलची तस्करी करत होती. धरमतर खाडीतील जेएसडब्लू आणि पिएनपी पोर्टवर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते.

डिझेलची तस्करी; 39 जणांच्या मुसक्या आवळल्या, 7 कोटी 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Aug 10, 2019, 8:01 AM IST

रायगड - खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर डिझेलची तस्करी करणाऱ्या 39 जणांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 7 कोटी 81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे डिझेल तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे.

डिझेलची तस्करी; 39 जणांच्या मुसक्या आवळल्या, 7 कोटी 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

परदेशातून येणाऱ्या जहाजांतून आणि धरमतर खाडीत मालवाहतूक करणाऱ्या बार्जेसमधून ही टोळी डिझेलची तस्करी करत होती. धरमतर खाडीतील जेएसडब्लू आणि पिएनपी पोर्टवर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. या मालवाहू बार्जवरील कॅप्टन आणि खलाशांशी संधान साधून हे सर्व जण कमी दराने बार्जमधील डिझेल खरेदी करत असत. नंतर हे डिझेल मच्छीमार बोटींना विकत असत. या डिझेल तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार रेवस जेटी परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि एका खाजगी बोटच्या सहाय्याने रांजणखार परीसरात धाड टाकली. या कारवाईत 2 बोटी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
या बोटींवर 8 हजार 300 लीटर डिझेल हस्तगत करण्यात आले. याची अंदाजे किंमत 5 लाख 68 हजार रुपयांच्या आसपास होती. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता अरबी समुद्रात पेट्रोलींग करणारे नेव्ही, सिमाशुल्क, कोस्टगार्ड व पोलिसांच्या संयुक्त गस्तीवरील नौकांना चुकवून रात्रीच्यावेळी अवैधपणे डिझेल खरेदी करून विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्हयातील अटक केलेले आरोपी हे भाऊचा धक्का, ससून डॉक मुंबई तसेच रेवस, मांडवा, करंजा येथील धक्क्यावरून बोटी घेवून समुद्रात प्रवेश करीत असल्याचे समोर आले. यानंतर परदेशी मालवाहू जहाजांतून अवैधरित्या डिझेल प्राप्त करून देणाऱया दलालाची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर कारवाई करून पोलिसांनी या डिझेल तस्करीत आतापर्यंत 39 जणांना ताब्यात घेतले. त्यात माल घेणारे एजंट, माल विकणारे बार्ज वरील कॅप्टन, खलाशी तसेच अवैध डिझेलचा साठा बाळगणारे मच्छिमार, अशा वेगवेगळया आरोपींचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण 20 हजार 900 लीटर डिझेल आणि 8 बोटी, 3 बार्ज, असा एकूण 7 कोटी 81 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे समुद्रात चालणाऱ्या डिझेल तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त झाले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अनील पारस्कर आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचीन गुंजाळ यांनी दिली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस उपनिरक्षीक निकाळजे, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कराळे, पोलीस हवालदार शेवते, पोलीस हवालदार गाणार आणि पोलीस शिपाई सावंत, यांनी महत्वाची भूमिका बजावली.

ABOUT THE AUTHOR

...view details