मुंबई - लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या मार्चमध्ये होण्याची शक्यता असल्याने उद्यापासून ६ दिवस राज्याचे लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात सरकारला दुष्काळाच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. यासोबतच, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावरही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला घेरणार - धनंजय मुंडे - adhiveshan
दुष्काळी भागात तातडीने जनावरांच्या छावणी सुरू करणे, चारा उपलब्ध करून देताना सरकारने घेतलेले निर्णयावर सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचा विशेष गंभीर असून केंद्र सरकारकडून मिळालेली मदत ही तुटपुंजी असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी भागात तातडीने जनावरांच्या छावणी सुरू करणे, चारा उपलब्ध करून देताना सरकारने घेतलेले निर्णयावर सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. या लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनातील शेवटचे २ दिवस या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्य़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने हा निर्णय सरकारला बदलावा लागला आहे. केवळ ४ महिन्यांच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी लेखानुदान अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर हे अधिवेशनापूर्वी अभिभाषण करणार आहेत. अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधक सरकारला धारेवर धरण्याची तयारी करत आहेत.