महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे अक्कल येतेच असे नाही, धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - devendra fadnavis

हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By

Published : Apr 24, 2019, 2:31 PM IST

रायगड - हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे हे ग्रामपंचायतीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत, आमदार, खासदार, मंत्री काहीच नाहीत मग त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालहा मुंडेंनी केला.

मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. इडीची पिडा टळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मानाचा मुजरा करायला गुजरातला गेलात. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आलात असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले.


मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही वाचाळताही वाढत चालली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही वाचाळता वाढत चालल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणुकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नसल्याचे मुंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details