रायगड - कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाने लॉकडाऊन करण्यात आला. सगळीकडे संचारबंदी लागू झाल्याने सर्व व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे मजूर, कामगार, गरजूंच्या पोटापाण्याची व्यवस्था शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्था करत आहेत. मात्र, या संचारबंदीचा फटका रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांनाही बसला आहे. याची जाणीव होताच रोहा शहरातील कुमार देशपांडे आणि त्यांच्या मुलीने या मुक्या प्राण्यांचे अन्नदाता होण्याचे ठरवले. हे दोघे बापलेक दररोज शहरात फिरून या भटक्या प्राण्यांना खायला देत आहेत.
लॉकडाऊन काळात 'ते' ठरत आहेत मुक्या प्राण्यांचे अन्नदाता
लॉकडाऊनचा फटका जसा नागरिकांना बसला आहे तसा शहरात फिरणाऱ्या प्राण्यांनाही बसला आहे. शहरातील हॉटेल्स, चिकन, मटण दुकानातील राहिलेले अन्न हे या प्राण्यांना खाण्यासाठी दिले जाते. मात्र, सध्या हॉटेल्स, चिकन, मटण दुकाने बंद झाल्याने या भटक्या प्राण्यांच्या खाण्याचे वांदे झाले आहेत.
कोविड 19 अर्थात कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन लागू झाले आहे. लॉकडाऊनचा फटका जसा नागरिकांना बसला आहे तसा शहरात फिरणाऱ्या प्राण्यांनाही बसला आहे. शहरातील हॉटेल्स, चिकन, मटण दुकानातील राहिलेले अन्न हे या प्राण्यांना खाण्यासाठी दिले जाते. मात्र, सध्या हॉटेल्स, चिकन, मटण दुकाने बंद झाल्याने या भटक्या प्राण्यांच्या खाण्याचे वांदे झाले आहेत.
प्राण्याच्या खाण्यापिण्याची झालेली ही दशा पाहून रोहा शहरातील कुमार देशपांडे आणि त्याच्या मुलीने शहरातील भटक्या प्राण्यांना जेवण देण्याचे ठरवले. रात्रीच्या वेळी हे बापलेक शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून प्राण्यांसाठी दहीभात आणि त्यात थोडी पेडीग्री टाकून खायला घालत आहेत. नागरिकांनी आपल्या भागात असलेल्या श्वान, गायी यांना सोयीनुसार अन्न द्यावे, असे आवाहनही देशपांडे यांनी नागरिकांना केले आहे.