महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज रायगडमध्ये - रायगड

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज (4 मे) रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार हे श्रीवर्धन तर बाळासाहेब थोरात अलिबागयेथे येणार आहेत.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By

Published : Jun 4, 2021, 2:24 AM IST

Updated : Jun 4, 2021, 5:27 AM IST

रायगड - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज (4 मे) रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार हे श्रीवर्धन तर बाळासाहेब थोरात अलिबागयेथे येणार आहेत. तौक्ते वादळ आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात हे जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक घेणार आहेत. तर, अजित पवार हे श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करणार आहेत.

पावार यांच्या हस्ते पाणी योजनेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीवर्धन येथे सकाळी 10 वाजता नगरपरिषद आयोजित पाणी पुरवठा योजना आणि समुद्र किनारा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करणार आहेत. तसेच, साडेदहा वाजता श्रीवर्धन नगरपरिषद विकासकामांबाबत आढावा बैठकही घेणार आहेत. दरम्यान, साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पुढे सुतारवाडी येथे ते रवाना होणार आहेत.

थोरात यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अलिबाग येथे दोऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेबारा वाजता अलिबाग मांडवा येथे ते येतील. माजी आमदार मधुकर ठाकूर यांची शितोळे आळी येथे त्याच्या निवास स्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर तुषार शासकीय विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तौक्ते वादळ आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

Last Updated : Jun 4, 2021, 5:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details