रायगड -खोपोली तसेच खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग नवी मुंबईमध्ये येतो, मात्र नवी मुंबई महापालिकेची पहिली बस ही सकाळी 7:20 ला असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी उशीर होतो. ही अडचण लक्षात घेऊन, पहिली बस सकाळी 6 वाजता सुरू करावी, तसेच दुपारच्या वेळी एसीबस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे.
खालपूर: प्रवाशांच्या सोयीसाठी एसीबस सुरू करण्याची मागणी - रायगड जिल्हा लेटेस्ट न्यूज
खोपोली तसेच खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग नवी मुंबईमध्ये येतो, मात्र नवी मुंबई महापालिकेची पहिली बस ही सकाळी 7:20 ला असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी उशीर होतो. ही अडचण लक्षात घेऊन, पहिली बस सकाळी 6 वाजता सुरू करावी, तसेच दुपारच्या वेळी एसीबस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
एसी बस सुरू करण्याची मागणी
पनवेल व नवी मुंबईत मेडीकल, अभियांत्रिक, विधी असे विविध शाखांचे महाविद्यालये आहेत. तसेच अनेक प्रशासकीय कार्यालये आणि खासगी कार्यालये देखील आहेत. त्यामुळे या परिसरात विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची वर्दळ असते. मात्र खोपवलीमधून सुटणारी पहिली बस ही 7:20 असते, त्यामुळे नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना उशीर होतो. तसेच सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने प्रवाशांसाठी दुपारच्या वेळेला एसी बस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती ईश्वर शिंपी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.