महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'१० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, पदवी परीक्षेबाबतचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्या' - MP Supriya Sule on degree examination

पदवी परीक्षा घ्यायची की, नाही याबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जर ही परीक्षा झाली नाही तर ज्या मुलांना पुढचे शिक्षण घ्यायचे, त्यांची अडचण होईल. हे प्रकरण न्यायालयात आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, कारण जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Decide on the degree examination by August 10 says MP Supriya Sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Aug 8, 2020, 8:04 PM IST

Updated : Aug 8, 2020, 8:14 PM IST

रायगड -पदवी परीक्षा घ्यायची की, नाही याबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जर ही परीक्षा झाली नाही तर ज्या मुलांना पुढचे शिक्षण घ्यायचे, त्यांची अडचण होईल. हे प्रकरण न्यायालयात आहे. याचा केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावावा. तसेच 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, कारण जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.


राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टतर्फे गोरेगाव येथे कोकणातील 16 महाविद्यालयांना 100 संगणक व इतर साहित्याचे वितरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या भाषणात बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड उपस्थित होते.

सुप्रिया सुळे, खासदार


कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर शाळा कॉलेजही बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. असे असताना विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वेगळी मते आहेत. दोघांच्या मतप्रवाहामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या पुढील शिक्षणासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे 10 ऑगस्टपर्यंत परिक्षांचा निर्णय घेऊन तोडगा काढा असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Aug 8, 2020, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details