महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2022, 1:27 PM IST

ETV Bharat / state

Panvel Road Accident : घरी परतत असताना दोन जिगरी मित्रांचा अपघाती मृत्यू

पनवेल परिसरात कामानिमित्त गेलेल्या दोन जिगरी मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागच्या जागी मृत्यू झाल्याची सनसनाटी घटना घडली आहे. नव्यानेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या मारुती आरटीगा गाडीने प्रवास करतांना अज्ञात वाहनाला धडक लागून, पळस्पे परिसरात झालेल्या अपघातात आवरे गावातील मोहिंदर श्यामकांत गावंड आणि अलंकार नारायण पाटील या दोघांचा जागच्या जागी मृत्यू झाला आहे. (Two friends died on the spot, road accident)

Panvel Road Accident
पनवेल रोड भीषण अपघात

पनवेल:पनवेल परिसरात कामानिमित्त गेलेल्या दोन जिगरी मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागच्या जागी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नव्यानेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या मारुती आरटीगा गाडीने प्रवास करतांना अज्ञात वाहनाला धडक लागून भीषण अपघात झाला. उरणच्या आवरे गावातील मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील नामक दोघे युवक मंगळवारी कामानिमित्त पनवेल भागात गेले होते. रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या गाडीला पळस्पे भागात भीषण अपघात झाला. त्यात दोघेही जागच्या जागी ठार झाले आहेत. या अपघाताने आवरे गावाची आजची सकाळ ही अत्यंत वेदनामय झाल्याचे समोर आले आहे. दोन उमदे तरुण आवरे गावाने गमावल्याने गावात शोककळा पसरली आहे. (Two friends died on the spot, road accident)

पनवेल रोड भीषण अपघात

दोघांचाही मृत्यू: हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुरा झाला असून या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात गेलेल्या दोघांना ही दोन दोन लहान मुले आहेत. अपघातातील मोहिंदर गावंड हा कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम करीत होता तर अलंकार नारायण पाटील हा पर्ल फ्रेट सर्व्हिसेसमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करीत होता. मोहिंदर गावंड याच्या मागे दोन लहान मुले , पत्नी आणि वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे तर अलंकार पाटील याला देखील दोन लहान मुले , मोठ्ठा भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. शालेय जीवनापासून अतिशय जिगरी दोस्त असलेल्या या दोघांचा मृत्यू ही एकत्रित अपघातात एकाच वेळी झाला असल्याने आवरे गाव हळहळला आहे.

अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नाची गरज:उरण, पनवेल तालुका झापात्याने विकासाकडे वळत असताना, रस्ते अपघाताची आकडेवारी उच्चअंक गाठू लागले आहेत. या अपघातांमध्ये मृत्यूची संख्यांही मोठी आहे. विशेष म्हणजे अपघाती मृत्यूमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. यामुळे प्रशासनाने रस्ते अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details