रायगड-अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काशीनाथ हंबीर (40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. ३ ते ४ दिवसापूर्वी तो व्यक्ती टाकीत पडला असल्याची माहिती आहे. मंगळावीर तो आढळून आला. त्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. मात्र, या घटनेमुळे उमटे धरणातून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तीन दिवस बंद राहणार असून यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत.
उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह;पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
काशीनाथ हंबीर यांच्या मृत्यूबाबत रेवदंडा पोलीस निरीक्षक जैतापूरकर तपास करीत आहेत. हंबीर हे टाकीत कसे पडले याबाबत कारण समजू शकलेले नाही.अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत पडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. काशीनाथ हंबीर याचा हा मृतदेह असल्याची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनास रुग्णालयात पाठविण्यात आला.
उमटे धरणातील शुद्धीकरण केलेले पाणी या टाकीत साठवून त्याद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मृतदेह काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पूर्ण टाकीतील पाणी काढून टाकून टाकी स्वच्छ केली आहे. मात्र, पुढील तीन दिवस साठ ते सत्तर गावातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गरम करून पिण्याचे आवाहन चौल ग्रामपंचायत तसेच इतर ग्रामपंचायतींनी केले आहे.