महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, DAV च्या रणरागिणींनी 'पानिपत'मध्ये रोवला महाराष्ट्राचा झेंडा - डी.ए.व्ही.च्या खेळाडूंनी रोवला महाराष्ट्राचा झेंडा न्यूज

हरयाणा राज्यातील पानिपत येथे राष्ट्रीय पातळीवरील फूटबॉल, स्विमिंग, तायक्वांडो, कराटे, बास्केटबॉल, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस अशा वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत न्यू पनवेल येथील डि.ए. व्ही. पब्लिक स्कुलमधील विद्यार्थीनींनी चमकदार कामगिरी केली.

DAV school of panvel students won medals in panipat national sports tournament
पनवेलकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, डी.ए.व्ही.च्या रणरागिणींनी 'पानिपत'मध्ये रोवला महाराष्ट्राचा झेंडा

By

Published : Dec 9, 2019, 1:12 PM IST

पनवेल -राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर विराजमान करत पनवेलच्या डी.ए.व्ही.स्कुलच्या रणरागिणींनी पनवेलकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धेत ६ सुवर्ण पदके, ३ रौप्य पदके आणि २ कांस्यपदके अशी एकूण ११ पदके जिंकून आल्यानंतर या स्पर्धकांचे पनवेलमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

न्यू पनवेल येथील डि.ए. व्ही. पब्लिक स्कुलमधील विद्यार्थीनी

हेही वाचा -३५ वी हॅट्ट्रिक नोंदवत मेस्सीने मोडला रोनाल्डोचा विक्रम

हरयाणा राज्यातील पानिपत येथे राष्ट्रीय पातळीवरील फूटबॉल, स्विमिंग, तायक्वांडो, कराटे, बास्केटबॉल, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस अशा वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत न्यू पनवेल येथील डि.ए. व्ही. पब्लिक स्कुलमधील विद्यार्थीनींनी चमकदार कामगिरी केली. या शाळेने फुटबॉल आणि टेनिसटेबल स्पर्धेत तिसरा, बॅटमिंटन, लॉन टेनिस आणि बास्केटबॉल स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यातील एकूण 6 संघाचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये डि.ए.व्ही. स्कुलच्या १४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. डि. ए.व्ही संघाला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी स्कूलच्या प्रिन्सिपॉल जयश्री खांडेकर, सीमा मनीदिरात, क्रीडा शिक्षिका नेहा चव्हाण, धन्वंतरी गायकवाड, आणि प्रशिक्षक विशाल यादव यांनी सहकार्य केले.

फुटबॉल स्पर्धा - युगंधारा गावंड, निर्मिती मोरे, काव्या उडगी आणि संघाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
टेबल टेनिस स्पर्धा - संस्कृती शर्मा आणि संघाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
बास्केटबॉल -आदिती, अनुष्का, अदिला आणि संघाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

अन्य खेळाडू -

  • यशस्वी खरात- तीन सुवर्णपदके (स्विमिंग)
  • सानिका जाधव- सुवर्णपदक आणि रौप्यपदक (स्विमिंग)
  • वसुंधरा- सुवर्णपदक (तायक्वांडो)
  • उन्नती सत्रे- सुवर्णपदक (कराटे)
  • प्राची ठक्कर- रौप्यपदक (कराटे)
  • आरुषी अग्रवाल- रौप्यपदक (कराटे)
  • चिन्मयी गमरे- रौप्यपदक (कराटे)

ABOUT THE AUTHOR

...view details