रायगड - अलिबाग महावितरण विभागातर्फे महा कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जा पर्व साजरे केले जात आहे. यानिमित्ताने अलिबाग शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखविला. जीवाश्म इंधनाचा साठा दिवसागणिक कमी होत असून सौर ऊर्जा म्हणजेच हरित ऊर्जेचा वापर करणे नितांत गरजेचे आहे. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना शाश्वत वीज पुरवठा दिल्यास त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल व खऱ्या अर्थाने राष्ट्र सुजलाम - सुफलाम होईल. असे मत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
अलिबाग महावितरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन महावितरणतर्फे आता माझे वीज बिल माझी जबाबदारीमहावितरण विभागातर्फे 'माझे वीज बिल माझी जबाबदारी' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. कृषी पंप विज जोडणी धोरण २०२०, सौर कृषी वाहिनीव्दारे दिवसा पुरवठा करणे, कृषी ग्राहकांकडून जमा झालेल्या विज बिल रकमेचा विनियोग कृषी ग्राहकांकरीता पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरण करण्याविषयीच्या तरतुदींचा आढावा घेण्यात आला. वीजबिल वसुलीत ग्रामपंचायतींचा सहभाग असल्यास ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण होईल, असे मत भांडुप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकाऱ्यांचा रॅलीला हिरवा झेंडासौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे. याचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. तसेच निसर्ग चक्रीवादळात महावितरणच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सर्व संबंधीत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी अलिबाग उपविभागाचे सादेकपाशा इनामदार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मोतीराम राख, उपकार्यकारी अभियंता तसेच पेण उपविभागाचे अभियंते तसेच विभागीय, उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी भरले कृषी पंपाचे बिलजिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू झालेल्या रॅलीची खंडाळा गावात सांगता झाली. हया ठिकाणी काशिनाथ तुणतुणे, विकास पाटील, पांडुरंग पाटील, विष्णू म्हात्रे हया शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी पंपाच्या विज बिलाचा भरणा केला. त्यांनतर अधीक्षक अभियंता पेण हयांच्या मार्गदर्शनाखाली "माझे विज बिल - माझी जबाबदारी " व "बळीराजा जागा हो, विज बिलातून मुक्त हो" आदी घोषणा दिल्या.