रायगड - खालापूर तालुक्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उपचाराची सोय व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने खोपोलीत उभे राहणारे कोविड रुग्णालय सज्ज झाले आहेत. शासनाच्या परवानग्या मिळविण्यासाठी प्रस्ताव देखील सादर करण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी रुग्णालयाला परवानगी दिल्यानंतर दोन-चार दिवसात कोविड रुग्णालय सुरू होईल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळेल. कोविड हॉस्पिटलची प्राथमिक पाहणी व येथील उपकरणाच्या पाहणीसाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत येत्या आठवडाभरात सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध करून रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची सकारात्मक चर्चा झाली असून रुग्णांना कोणत्याही सुविधा कमी पडू नयेत, अशी सूचना कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या बैठकीत केली आहे.
खालापूर-खोपोलीत येत्या आठवड्याभरात कोविड रुग्णालय सुरू होणार - आमदार महेंद्र थोरवे - MP shrirang barane
खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंता वाढवत असून शहर आणि तालुक्यात उपचाराची सोय नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी अन्य शहरांमध्ये जावे लागत होते. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने गरजू आणि सर्वसामान्य रूग्णांच्या उपचाराची मोफत व्यवस्था व्हावी, या उद्देशाने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत खोपोलीत कोविड रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी अन्य शहरांमध्ये जावे लागत होते. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने गरजू आणि सर्वसामान्य रूग्णांच्या उपचाराची मोफत व्यवस्था व्हावी, या उद्देशाने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत खोपोलीत कोविड रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आमदार महेंद्र थोरवे यांनी या रुग्णालयासाठी 50 लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर तालुक्यातील कारखानदारांची बैठक घेत कोविड रुग्णालयाला सीएसआर फंडातून मदत करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही सर्व प्रकारच्या सहकार्याची ग्वाही दिली आहे. कोविड रुग्णालयाच्या प्रयत्नांना सर्वच बाजूंनी अशा प्रकारे मदत मिळू लागल्याने केएमसी महाविद्यालयात उभ्या राहणार्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. रुग्णालयाच्या मंजूरीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला आहे. शासनाच्या परवानग्या मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्यानंतर दोन चार दिवसात रुग्णालय सुरू होईल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, हे रुग्णालय सर्व सोयी निशी चालू व्हावे यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.